वेंगुर्ले.ता.२१: कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण देशभरात भाजपाच्या वतीने सेवा कार्य सुरू आहे. भाजपा वेंगुर्ले च्या वतीने लाॅकडाऊन मुळे कामे बंद असल्याने रोजंदारी वर काम करणारे स्थानिक, तसेच मोलमजुरी करून जगणारे लोकांची या काळामध्ये उपासमार होवु नये म्हणुन तालुक्यात ठीक ठिकाणी जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात येत आहे.
असेच वेंगुर्ले शहरातील देवुळवाडा , राऊळ वाडा – साकववाडी येथील २४ गरीब कुटुंबांना नगराध्यक्ष राजन गिरप यांचे हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक प्रशांत आपटे, शरद परब, महिला मोर्चा च्या आकांक्षा परब, बाळु प्रभु, प्रकाश धावडे इत्यादी उपस्थित होते.