वेंगुर्ला.ता.२१: वेंगुर्ला तालुक्यातील वजराट ग्रामस्थांतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५१,०१९ रुपये चा निधी देण्यात आला. सोमवारी ग्रामस्थांतर्फे सदर निधीचा चेक वेंगुर्ले तहसीलदार प्रविण लोकरे यांच्याकडे देण्यात आला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटावर मात करण्यासाठी मदतीचे आवाहन केलेले आहे. वजराट गावातील ग्रामस्थांनी- युवकांनी राबविलेल्या व्हाट्सअप्पच्या माध्यमातून ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये ८ वर्ष मुलीपासून, ज्येष्ठ नागरिक, गावापासून मुंबई, बेळगाव, पुणे,येथील वजराटवासीय तसेच वजराट माहेरवाशिणी यांनी या निधीसाठी योगदान दिले. फक्त ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून या उपक्रमांतर्गत ५ दिवसांमध्ये ५१,०१९ रुपये इतका निधी जमा झाला.या उपक्रमासाठी बाबुराव परब, वामन भोसले, महेश राणे, नितीन परब,आनंद पुराणिक, नितीन चव्हाण, राजन परब, सुचिता वजराटकर, वसंत पेडणेकर, निवृत्ती घोणे, सुधाकर कदम, प्रविण गावडे, पांडुरंग दळवी, विजय नळेकर,नयना धुरी,बाळकृष्ण सोनसुरकर, अंकुश राणे, सचिन देसाई, विठ्ठल परब,समिर विटेकर इत्यादींचे योगदान लाभले
वजराट ग्रामस्थांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES