पराशर सावंत; ग्रामस्थांच्यावतीने वीज वितरण कंपनीकडे मागणी….
दोडामार्ग.ता,२१: कोनाळ येथील ग्रामपंचायत हद्दीत गेल्या काही दिवसांपूर्वी विद्युत तारा तुटून गावातील काही शेतकऱ्यांची काजू-कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या,ऐन काजूच्या हंगामात विद्युत तारा तुटून लागलेल्या आगीत शेतकऱ्यांवर संकट ओढावले असून, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
या संदर्भात विजवीतरण कार्यालय साटेली भेडशी वरिष्ठ अभियंता यांच्याशी नुकसानीच्या पंचनाम्याबाबत चर्चा केली.असून त्यांनी पंचनामे हे तलाठयांमार्फत करण्यास सांगितले आहे.असे सरपंच पराशर सावंत यांनी सांगत सदर प्रकरणाचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे, अशी लेखी मागणी त्यांनी दोडामार्ग तहसीलदार मोरेश्वर हाडके यांच्याकडे केली आहे.