नेतर्डे-गावठाणवाडी येथिल घटना; वनविभागाच्या सहाय्याने नैसर्गिक अधिवासात सोडले…
बांदा,ता.२१: भक्ष्याचा पाठलाग करणारा बिबट्या थेट विहीरीत कोसळल्याचा प्रकार आज नेतर्डे गावठाणवाडी येथे उघडकीस आला.दरम्यान याबाबतची माहीती वनविभागाला मिळाल्यानंतर कर्मचारी व अधिकार्यांनी तात्काळ त्या ठीकाणी धाव घेवून त्या बिबट्याची सुटका केली.
हा प्रकार आज सकाळी नेतर्डे गावठणवाडी येथिल शेतकरी दत्तात्रय गवस यांच्या शेतात घडला. दरम्यान याबाबतची माहीती मिळाल्यानंतर त्या ठीकाणी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सावंतवाडी वनविभागाचे वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे, बांदा वनपाल अनिल मेस्त्री,वनरक्षक संतोष गोसावी,रमेश मोरे आदींनी बिबट्याला बाहेर काढण्यासाठी सहकार्य केले.