संजू परबांची मागणी; याप्रकरणात जिल्हा प्रशासन दोषी,मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार…
सावंतवाडी ता.२१: कोरोनाच्या काळात मुंबईतुन या ठीकाणी येवून जिल्ह्यात बिनधास्त फीरणार्या खासदार विनायक राउत यांच्यासह अतुल रावराणे यांना प्रशासनाने कॉरन्टाईन करणे गरजेचे होते,मात्र तसे झाले नाही.त्यामुळे या प्रकरणात प्रशासन दोषी आहे.त्यांना तात्काळ कॉरन्टाईन करावे,अन्यथा याबाबत आपण मुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार आहे,असा इशारा भाजपाचे प्रवक्ते तथा नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे दिला.दरम्यान आमचे भाजपाचे नेते असलेले आमदार नितेश राणे हे मुंबईतून या ठीकाणी आले,मात्र त्यांनी जिल्हावासीयांची सुरक्षा आणि काळजी लक्षात घेवून स्वतः त्यांनी कॉरन्टाईन करुन घेतले,हा त्यांचा मोठेपणा आहे.त्यामुळे याचा आदर्श सत्तेतील नेत्यांनी घ्यावा,लोकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न करू नये,असेही त्यांनी यावेळी सांगितले.याबाबत श्री.परब यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली .यावेळी नगरसेवक नासिर शेख,सुधीर आडिवरेकर,राजू बेग, मनोज नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी श्री.परब पुढे म्हणाले, कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात मतदारसंघातील लोकांना आधार द्यायचा सोडून माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी स्वतःला मुंबईत कॉरन्टाईन करून घेतले आहे.ही चुकीची बाब आहे.सद्यस्थितीत एक आमदार म्हणून जनतेला त्यांची गरज होती,मात्र त्यांनी पाठ फिरवल्यामुळे मतदारसंघात नाराजी आहे.असाही आरोप त्यांनी यावेळी केला.दरम्यान शिवसेनेचे काही नेते मंडळी सत्तेचा गैरफायदा उचलत आहे.पूर्ण जग कोरोनाच्या संकटात असताना जबाबदार नेते मंडळींकडून,असा हलगर्जीपणा उपयोगाचा नाही. हा सर्व प्रकार म्हणजे येथील जनतेच्या जीवाशी खेळण्या सारखाच आहे सद्यस्थितीत खासदारांसह शिवसेनेचे नेतेमंडळी मुंबईसारख्या रेडझोन मध्ये असलेल्या ठिकाणाहून जिल्ह्यात येत आहेत आणि स्वतःला कॉरन्टाईन न करता जिल्ह्याच्या दौऱ्यावर फिरताहेत,मात्र याची प्रशासन सुद्धा खबरदारी घेत नाही.त्यामुळे जिल्ह्यात काही अपरित घडल्यास मी प्रशासनाला जबाबदार धरेन, तर जिल्ह्याला धोका पोहोचू नये,यासाठी मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा याबाबत निवेदन देणार आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.