कणकवली, ता.२१: येथील कृषी विभागात कार्यरत असलेल्या हितेश पुजारे (वय 34, रा.पळसंब, ता.मालवण) याने आज आत्महत्या केल्याची बाब उघड झाली. शहरातील शिवाजीनगर येथील एका पडक्या घरामध्ये गळफास लावलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळून आला. तालुक्यातील कलमठ गावात कृषिसेवक म्हणून तो कार्यरत होता.
हितेश पुजारे याचा विवाह वर्षभरापूर्वी झाला होता. त्याचे वडील कृषी विभागात होते. त्यांच्या निधनानंतर हितेश हा कृषी विभागात कणकवली कार्यालयात कामाला होता. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही. पोलिसांनी पंचनामा केला आहे. हितेश यांचे पुजारी कुटुंब मूळ मालवण तालुक्यातील पळसंब येथील आहेत गावातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.