सिंधुदुर्गनगरी, ता.२१: कोरोना प्रदुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी सदैव कार्यरत आहेत.अशा वेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलीसांचे आरोग्य सुरक्षित रहावे यासाठई टेलिमेडिसीनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
विनामुल्य आरोग्य तपासणीसाठी 020-67525741 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या सुविधेअंतरग्त कोणत्याही पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मध्य्म ते तीव्र खोकला, कोरडा खोकला, घशात खवखवने, श्र्वासास त्रास होणे, छातीत दुखणे, अशक्तपणा, ताप या सारखी लक्षणे असल्यास टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा. त्यानंतर या यंत्रणेअंतर्गत समन्वयक 45 मिनीटात संबंधीत पोलिसांशी संपर्क साधून वेळ निश्चित करुन त्यानुसार ठरलेल्या वेळी फोन कॉल किंवा व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन पाठवणार आहेत.
यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांकडून प्राप्त सल्ल्यानुसार योग्य औषधे पोलिसांना वेळेत उपलब्ध होणार आहेत. कर्तव्यावर असलेल्या कोणत्याही ठिकाणावरून डॉक्टरांशी संवाद साधणे शक्य होणार आहे. पोलिसांच्या आरोग्यासाठी टेलिमेडीसीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी सांगितले.
पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी “टेलेमेडिसिन” ची सुविधा…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES