साक्षी वंजारी; खासदार विनायक राऊत हे जनतेच्या सुरक्षेसाठी मतदारसंघात…
सावंतवाडी,ता.२१: कोरोना सारख्या कठीण परिस्थितीत खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री उदय सामंत हे जिल्ह्यात लोकांसाठी दौरा करत आहेत. त्यामुळे अश्या गोष्टीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी राजकारण करणे अत्यंत चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ.साक्षी वंजारी यांनी दिली.
विनायक राऊत हे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यामुळे लोकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी आपण स्वतःहून लोकांकडे जाऊन त्यांची विचारपूस करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यात कोणतेही राजकारण नाही. अशा परिस्थितीत आपल्याकडून होईल त्यासाठी परब यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र, त्यासाठी चुकीच्या पद्धतीने राजकारण करणे त्यांना शोभत नाही, असेही सौ वंजारे यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजू परब यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली होती. त्याला वंजारी यांनी उत्तर दिले आहे.