सावंतवाडी.ता,२१: कोलगाव येथिल स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कुलची कु.अस्मी अमेय प्रभू तेंडोलकर या पहिलीत शिकणार्या विद्यार्थीनीने ब्रेन डेव्हलमेंट परिक्षेत तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.तर ती जिल्ह्यात तिसरी आणी राज्यात ३६ वी आली आहे.तिला सुवर्णपदक देवून गौरविण्यात आले आहे.
तिच्या या यशाबद्दल प्रशालेचे संचालक रुजूल पाटणकर,सौ.रुचा पाटणकर,शिक्षक दिशा कामत,प्राची साळगावकर यांनी तीचे अभिनंदन केले.अस्मी ही सावंतवाडीतील उद्योजक तथा युवा नेते अमेय तेंडोलकर यांची मुलगी आहे.
जानेवारी २०२० मध्ये ही परिक्षा झाली होती. अस्मी ही
रेडी येथील गोगटे फोमेंतो कंपनीचे माजी जनरल मॅनेजर यशवंत प्रभू तेंडोलकर व रेडी हायस्कुलच्या माजी शिक्षिका सौ वनिता यशवंत प्रभू तेंडोलकर यांची नात तसेच युवा उद्योजक अमेय यशवंत प्रभू तेंडोलकर व सावंतवाडी येथील वाॅव किड्स रायन स्कूलच्या शिक्षिका सौ जागृती प्रभू तेंडोलकर यांची कन्या होय..
कुमारी अस्मि हिच्या या उत्तुंग यशात तिच्या आजी-आजोबा तसेच तिची आई वडील व माडखोल शाळेचे शिक्षक श्री दत्तराम सावंत यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.