संध्या तेरसेःप्रशासनाने घालून दिलेले नियम पाळणे काळाची गरज
कुडाळ.ता,२२: खासदार विनायक राउत यांनी स्वतःच्या सरकारने घालून दिलेले नियम पाळावेत.आपल्या लवाजम्यासह जिल्ह्यात दौरे करून नाहक जनतेचा जीव धोक्यात घालू नये, अशी टिका भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ.संध्या तेरसे यांनी केले आहे. जिल्ह्यात सदयस्थितीत तरी एक ही कोरोनाचा रुग्ण नाही.त्यामुळे जिल्हा आणी पोलिस प्रशासनाकडुन काटेकोर नियमाची अमंलबजावणी करण्याचे काम सुरू आहे.
त्यामुळे त्यात आडकाठी आणण्याचे काम सत्ताधार्यांनी करू नये,असे ही त्यांनी म्हटले आहे.सौ तेरसे यांनी याबाबत प्रसिध्दीपत्रक दिले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे,की लोकप्रतिनीधींनी जनतेसमोर आदर्श ठेवणे गरजेचे आहे.मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून खासदार राऊत हे जिल्ह्यातील जनतेच्या जीवाशी खेळत आहे. त्यांच्याकडुन स्वतःच्या सरकार कडुन घालून देण्यात आलेले नियम पाळले जात नाही.हे दुदैव आहे.असे त्यांनी म्हटले आहे.