वैभववाडी.ता.22ः श्री महालक्ष्मी वि. मं. कोकिसरे शाळेतील इयत्ता पहिली मधील कु.आयुष प्रदीप नाळे याने ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत १०० पैकी ९३ गुण मिळवून ऑल इंडिया रँक मध्ये गोल्ड मेडल मिळवून स्कॉलरशिप प्राप्त केली आहे. तसेच इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेत २०० पैकी १९४ गुण मिळवून राज्यात चौथा क्रमांक , मंथन परीक्षेत १५० पैकी १३८ गुण मिळवून राज्यात सातवा क्रमांक, गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत १०० पैकी ९२ गुण मिळवून वैभववाडी तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
त्याला शाळेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया शेट्ये, अमोल येनगे, प्रफुल्ल जाधव, प्रदीप नाळे, पालक सौ. मेघा नाळे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी मारुती थिटे, विस्तार अधिकारी निसार नदाफ, मुकुंद शिनगारे , केंद्रप्रमुख शिवाजी पवार, शाळा व्यवस्थापन समिती, पालक-शिक्षक संघ, माता पालक संघ, सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
कोकिसरे प्राथमिक विद्यालयाचा आयुष नाळे चे विविध स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश….
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES