राजन तेलींच्या हस्ते शुभारंभ; नियमीत तिनशेहून गरजुंना मिळणार लाभ….
सावंतवाडी,ता.२२: भाजपाच्या माध्यमातून आज येथे “कमळ थाळी”चा शुभारंभ करण्यात आला. माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील गरजुंना मायेचा घास घालण्यात आला. या भोजनाची आजची जबाबदारी नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांनी घेतली होती.
यावेळी नगराध्यक्ष संजू परब,पंचायत समिती सभापती उन्नती धुरी,नगरसेवक परिमल नाईक,नासीर शेख,राजू बेग,मनोज नाईक,दिपाली भालेकर मीसबा शेख, महेेश धुरी आदी उपस्थित होते.आमदार तथा भाजपाचे नेते नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी पालिकेच्या माध्यमातून आज या ठीकाणी कमळ थाळी सुरू करण्यात आली. येथिल बॅ.नाथ पै सभागृहाच्या ठीकाणी ३ मे पर्यत ही थाळी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उदघाटन आज भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोहीनी मडगावकर,बंटी राजपुरोहीत,निशांत तोरसकर आदी उपस्थित होते.