जीवनावश्यक वस्तू प्रदान; नगराध्यक्ष संजू परब यांनी केले कौतुक…
सावंतवाडी,ता.२२: नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने आज शहरातील १५० गरीब व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात सोशल डिस्टनसिंगचे पालन करून हे वाटप पार पडले.
यावेळी
सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, महिला व बालकल्याण सभापती अनारोजीन लोबो,नासीर शेख,सुधीर आडिवरेकर, परिमल नाईक, दिपाली भालेकर, तसेच नगर पालिकेचे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष देविदास आडारकर,आसावरी शिरोडकर, दीपक म्हापसेकर,विजय बांदेकर ,डी.पी जाधव ,शिवप्रताप कुडपकर , नरहरी पिंगुळकर ,एकनाथ पाटील, माधवी म्हापसेकर ,तानाजी पालव ,आधी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना नगराध्यक्ष संजू परब म्हणाले,ज्या पालिकेचे मी नगराध्यक्ष म्हणुन काम पाहतो त्या पालिकेतील कर्मचारी व अधिकारी वर्गाने स्वतःच्या खिशाला चिमटा काढून केलेले हे धान्य वाटप मला अभिमानास्पद आहे.त्यांनी दाखविलेले हे दातृत्व कधीच वाया जाणार नाही.वाटप करण्यात आलेल्या धान्यामध्ये तांदुळ, तेल ,कडधान्य, साबण, साखर ,चहा पावडर तसेच मास्कचे वाटप करण्यात आले.