मालवण-रेवतळे प्रशालेचे “ब्रेन डेव्हलपमेंट” परीक्षेत १००% यश…

287
2
Google search engine
Google search engine

ओरोस,ता २२:   मालवण शहरातील रेवतळे येथील जिल्हा परिषद शाळेचा कोल्हापुर येथील ब्रेन डेव्हलपमेंट २०२० या बुद्धि स्पर्धा परीक्षेत १०० टक्के निकाल लागला आहे.प्रशालेच्या पहिलीच्या विद्यार्थिनी लेईशा नारायण पराडकर हिने १०० पैकी ८९ गुण मिळवत सिल्वर पदक पटकाविले आहे.
या स्पर्धेत  पाचवी मधील जिज्ञासा शिवराम सावंत व भक्ती रावजी बूटे यांनी ब्राँझ पदक मिळविले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना रोहिणी देशमुख, प्रिया सावंत या शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलेश शिरोडकर, शिक्षणप्रेमी हरी चव्हाण, नगरसेविका शीला गिरकर, राजिव बादेकर, उमेश मांजरेकर तसेच सर्व पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.