वेंगुर्ले.ता.२२:
श्री देवी माऊलीच्या कृपा आर्शीवादाने रेडी विकास मंडळ मुंबई (रजि.) तर्फे कोरोना व्हायरस संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या रेडी गावामधील नागोळेवाडी, बोबडोंजीचीवाडी, म्हारतळेवाडी, कनयाळ, गावतळे,सुकळभाट वाडी, हुडावाडी, या सात वाडयातील १३६ सामान्य गरजू ग्रामस्थाना जीवनावश्यक वस्तूचे वाटप रेडी विकास मंडळ मुंबई तर्फे करण्यात आले.
या वाटप कार्याची सुरवात स्वयंभू श्री देवी माऊली मंदिरात रेडी गावचे सरपंच श्री. रामसिंग राणे व माजी आरोग्य,शिक्षण सभापती, रेडी जि. प. सदस्य श्री. प्रितेश राऊळ यांच्या हस्ते करण्यात आली. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कार्यक्रमाचे नियोजन मंडळाचे अध्यक्ष श्री. अच्चुत राणे (मुंबई) व श्री. चंद्रकांत राणे , संस्थापकीय सदस्य यांच्या मार्गदर्शनाने उत्कृष्टरीत्या पार पडले, तसेच श्री. राजन रेडकर, भा.भ्र.नि.संस्था, कोकण विभाग सीईओ यांच्या नियोजनानुसार भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्य श्री. जगन्नाथ राणे, सौ.स्नेहल जगन्नाथ राणे, श्री. रविंद्र राणे, श्री अरुण राणे, श्री. अमित नाईक , श्री. सिताराम राणे, श्री सदानंद रेडकर, श्री. महादेव मराठे , श्री. सौरभ नागोळकर, श्री. दयानंद कृष्णाजी, श्री मुरलीधर राऊत,श्री सागर रेडकर ,राजेश सातोस्कर,(रेडी) आणि श्री. लक्ष्मीकांत कर्पे, श्री. संतोष अणसुरकर, श्री. विकास शेट्ये,(शिरोडा) व श्री सिध्देश शेलटे, श्री राजाराम (आबा) चिपकर,(आरवली) यांनी मोलाचे सहकार्य केले.
रेडी विकास मंडळ,मुंबईच्या वतीने गावातील १३६ गरजूंना मदत…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES