वैभववाडी.ता,२२: आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून वैभववाडी येथे मोफत कमळ थाळी भोजनाचा शुभारंभ आज दुपारी पार पडला. गरीब व गरजू, परप्रांतीयांनी या कमळ थाळी भोजनाचा आस्वाद घेतला. जवळपास दीडशे भोजन थाळी ची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती.
येथील पक्ष कार्यालयात सोशल डिस्टन्सिगचा अवलंब करत भाजपा कार्यकर्त्यांनी गरजूंना जेवण वाटप केले. नियोजनाची सर्व जबाबदारी वैभववाडी नगरपंचायत च्या सर्व नगरसेवकांनी घेतली आहे. लाँकडाऊन कालावधी पर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या शुभारंभ प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, शहर प्रभारी सुदन बांदिवडेकर, नगराध्यक्षा अक्षता जैतापकर, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, पं.स. सभापती अक्षता डाफळे, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, भालचंद्र साठे, प्रमोद रावराणे, सुधिर नकाशे, हर्षदा हरयाण, नगरसेवक रवींद्र रावराणे, संतोष पवार, राजेंद्र राणे, सुचित्रा कदम, संजय सावंत, बाळा हरयाण, प्राची तावडे, स्नेहलता चोरगे, संताजी रावराणे, शिवाजी राणे, दिपक गजोबार, नारायण मांजरेकर, पदाधिकारी उपस्थित होते.
वैभववाडीत मोफत ‘कमळ थाळी’ भोजनाचा शुभारंभ…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES