वैभववाडी.ता,२२: कोरोनाच्या संसर्गाने निधन झालेले चेन्नई वेल्लोर येथील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. सायमन यांचा स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यास नकार देत त्यांच्या नातेवाईकांवर हल्ला करणाऱ्या विकृत समाजकंटकांचा सिंधुदुर्ग जिल्हा डॉक्टर फ्रँटरनिटी क्लबच्या वतीने जाहीर निषेध करतो, अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे यांनी दिली आहे.
या हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवार दिनांक २३ एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांनी काळी फीत लावून रुग्ण सेवा करावी असे आवाहनही डॉ. पाताडे यांनी केले आहे. डॉक्टर सायमन यांचे कोरोनाचा संसर्ग झाल्याने निधन झाले. रुग्ण सेवा करणाऱ्या अशा देवदूताचा अंत्यविधी स्मशानभूमीत सन्मानपूर्वक होणे आवश्यक होते. मात्र स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचा अंत्यविधी स्मशानभूमीत करण्यास तीव्र विरोध केला.
त्यांचा मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका विकृत समाजकंटकांनी फोडली. यावेळी रुग्णवाहिकेत डॉ. प्रदीप व इतर नातेवाईक होते. दरम्यान हल्लेखोरांनी वाहनचालकावर जीवघेणा हल्ला केला. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा संघटनेमार्फत जाहीर निषेध करत असल्याचे डॉ. राजेंद्र पाताडे यांनी सांगितले.
डॉक्टरांच्या नातेवाईकांवर हल्ला करणाऱ्यांचा सिंधुदुर्ग जिल्हा फ्रॕटरनिटी क्लबच्यावतीने निषेध…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES