Wednesday, January 15, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याऑनलाईन दर्शन देवून आरवलीच्या वेतोबाचा वाढदिवस साजरा करणार...

ऑनलाईन दर्शन देवून आरवलीच्या वेतोबाचा वाढदिवस साजरा करणार…

देवस्थान अध्यक्ष जयवंत राय यांची माहीती ; २८ एप्रिलला होणार धार्मिक कार्यक्रम…

वेंगुर्ला,ता.२२: येथिल आरवलीच्या प्रसिध्द श्री देव वेतोबाचा वाढदिवस मंगळवारी ता. २८ ला होत आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमिवर देवाचे ऑनलाईन दर्शन देण्याची सुविधा देवस्थान समितीकडुन घेण्यात आले आहे. याबाबतची माहीती आरवली देवस्थानचे अध्यक्ष जयवंत राय यांनी दिली.

सध्याची कोरोनाची परिस्थिती पहाता अशा परिस्थितीत श्री देव वेतोबाचा वाढदिवस सोहळा जाहीररित्या साजरा करणे शक्य होणार नाही. तसेच मंदिर दर्शनासाठी उघडे ठेवणे शक्य होणार नाही. या गोष्टींचे अत्यंत दुखः ट्रस्टला होते आहे. तरी सर्व भक्तमंडळीनी घरी बसून दर्शनाचा लाभ घ्यावा व श्री देव वेतोबाचे आशिर्वाद घ्यावेत. यासाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आपण सर्वजण घरी बसूनच या कोरोना रुपी जागतिक संकटातून ‘तू सर्वांची लवकरच मुक्तता कर’ अशी श्री देव वेतोबा चरणी प्रार्थना करुया. सर्वांसी सुख लाभावे तशी आरोग्य संपदा कल्याण व्हावे सर्वांचे कोणी दुःखी असू नये अशी प्रार्थना आपण सर्वांनी या दिवशी करूया असे आवाहन श्री देव वेतोबा देवस्थान, आरवली अध्यक्ष श्री जयवंत बाबुराव राय यांनी केले आहे.

सध्याची कोरोनाची परिस्थिती पहाता अशा परिस्थितीत श्री देव वेतोबाचा वाढदिवस सोहळा जाहीररित्या साजरा करणे शक्य होणार नाही. तसेच मंदिर दर्शनासाठी उघडे ठेवणे शक्य होणार नाही. या गोष्टींचे अत्यंत दुखः ट्रस्टला होते आहे. तरी सर्व भक्तमंडळीनी घरी बसून दर्शनाचा लाभ घ्यावा व श्री देव वेतोबाचे आशिर्वाद घ्यावेत. यासाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आपण सर्वजण घरी बसूनच या कोरोना रुपी जागतिक संकटातून ‘तू सर्वांची लवकरच मुक्तता कर’ अशी श्री देव वेतोबा चरणी प्रार्थना करुया. सर्वांसी सुख लाभावे तशी आरोग्य संपदा
कल्याण व्हावे सर्वांचे कोणी दुःखी असू नये अशी प्रार्थना आपण सर्वांनी या दिवशी करूया असे आवाहन श्री देव वेतोबा देवस्थान, आरवली अध्यक्ष श्री जयवंत बाबुराव राय यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments