सावंतवाडी.ता,२३: कोविड साथरोग पार्श्वभूमीवर असलेल्या लाॅकडाऊन काळात मुंबई येथील कै.दिनकर गंगाराम सामंत ट्रस्टतर्फे सावंतवाडी शहरातील तसेच माजगाव व कोलगाव येथील १०० गरजू कुटुंबियांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी तहसीलदार म्हात्रे,श्रीराम वाचन मंदिर ट्रस्टचे प्रसाद पावसकर,तौकीर शेख व इतर अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.डाॅ जयेंद्र परूळेकर यांच्या प्रयत्नातून सामंत ट्रस्टतर्फे ही मदत करण्यात आलेली आहे.
लाॅकडाऊन संपल्यानंतर सामंत ट्रस्ट तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाळीस गरजू व्यक्तींना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात येणार आहे.असे डाॅ.जयेंद्र परूळेकर यांनी सांगितले आहे.