संजय पडते; खासदारांवर टिका करणारी,स्वाभिमानी भाजपाची मंडळी विघ्नसंतोषी…
कुडाळ ता.२३: बाहेर गावातून आल्यानंतर आपण पाच दिवस कॉरन्टाईन राहणार,असे जाहीर करणार्या आमदार नितेश राणे यांना कॉरन्टाईनचा कालावधी चौदा दिवसाचा असतो हे माहीत नसणे दुदैव आहे.ते आता चौदा दिवस कॉरन्टाईन राहणार का ? असा सवाल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आज येथे केला.दरम्यान उगाचच वरिष्ट नेत्यांना खुश करण्यासाठी स्वाभिमानी भाजपाची काही विघ्नसंतोषी मंडळी खासदार राउतांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करीत आहेत.मात्र त्यांच्या नेत्यांनी कॉरन्टाईनचे नियम पाळले का ? याचे उत्तर भाजपाच्या नेत्यांनी द्यावे,असेही श्री.पडते यांनी म्हटले आहे.
खासदार राऊत यांच्या दौर्यावरुन शिवसेना आणि भाजपात जोरदार कलगीतूरा रंगला आहे.याला पडते यांच्याकडुन प्रसिध्दीपत्रकांच्या माध्यमातून प्रत्यूत्तर देण्यात आले आहे.यात त्यांनी असे म्हटले आहे की,आवश्यक असलेल्या परवानग्या आणि चाचण्या करूनच खासदार जिल्हयात दौरा करीत आहेत.मात्र काही स्वाभिमानी भाजपाचे लोक त्यांच्यावर टिका करीत आहेत.खासदार राऊत हे जिल्ह्यात येताना त्यांनी कोणताही लवाजमा आणलेला नाही.त्यांची गाडी त्यांचा मुलगा चालवत होता.परंतू भाजपाचे काही पोपटपंची करणारे लोक नाहक आमच्या नेत्यांवर टिका करीत आहेत.हा सर्व प्रकार चुकीचा आहे,असे त्यांनी म्हटले आहे.