जिल्हा शल्य चिकित्सकांचा दुजोरा; तपासणीसाठी नमुने पुणे येथे पाठविले…
सिंधुदूर्गनगरी ता.२३: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आयसोलेशन वार्डात उपचार घेणार्या दोघांसह आचरा येथे होम क्वारंटाइन करण्यात आलेल्या एका ७५ वर्षीय महिलेचा काल मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.यात आयसोलेशन वॉर्डात मृत्यू झालेल्यामध्ये एका ३५ वर्षीय तरुणाचा तर एका वृध्द पुरुषाचा समावेश आहे.दरम्यान तिघांचेही अहवाल तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.याबाबत जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकीत्सक डॉ.धनंजय चाकुरकर यांनी दुजोरा दिला.
श्री.चाकूरकर यांनी दिलेल्या माहिती नुसार,जिल्ह्यात कोरोना संशयित रुग्णांना म्हणजेच,ज्यांना ताप,सर्दी,खोकला ही लक्षणे आहेत.अशांना जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेश कक्षात दाखल केले जाते.मात्र गेल्या आठ दिवसात आयसोलेशन वार्डात उपचार घेणार्या रुग्णांच्या मृत्यूची एकूण संख्या आता चार वर पोहोचली आहे.त्यात यापूर्वी निधन झालेल्या दोघांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.तर काल मृत्यू झालेल्या दोघांसह आचरा येथील होम क्वारंटाइन असलेल्या मृत झालेल्या महिलेचा नमूना कोरोना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आला आहे.