ग्रामीण रुग्णालयात पी. पी. ई किटचे वितरण…
मालवण, ता. २३ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी मालवण तहसील कार्यालय व ग्रामीण रुग्णालयास भेट देत आढावा घेतला. रास्त धान्य पुरवठ्याची माहिती घेत त्यांनी आवश्यक सूचना दिल्या. यानंतर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांना शिवसेना पदाधिकारी अतुल रावराणे यांनी उपलब्ध करून दिलेल्या पी. पी. ई कीटचे वितरण करण्यात आले.
मालवण दौर्यावर आलेल्या आमदार नाईक यांनी येथील तहसील कार्यालयास भेट देत आढावा घेतला. यावेळी तहसीलदार अजय पाटणे, पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाबी जोगी, नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, दीपक देसाई, उमेश मांजरेकर, प्रवीण रेवंडकर, आतू फर्नांडिस यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यात आला. ठेकेदार, हॉटेल व्यावसायिकांना भेडसावणार्या समस्यांवरही चर्चा करण्यात आली.