भाई चव्हाण यांची मागणी ; प्रांताधिकार्यांशी चर्चा
कणकवली, ता. २३: कणकवली शहरात नगरपंचायतीने वॉर्ड निहाय भाजी विक्रेत्यांची व्यवस्था केली आहे. त्याचधर्तीवर ग्रामीण भागातून येणार्या भाजी विक्रेत्यांसाठीही स्वतंत्र व्यवस्था करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे भाई चव्हाण यांनी आज प्रांताधिकार्यांकडे केली. तर याबाबत मुख्याधिकार्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ अशी ग्वाही प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरात गर्दी होऊ नये यासाठी नगरपंचायतीने सर्व 17 प्रभागात भाजी विक्रेत्यांची व्यवस्था करून दिली आहे. मात्र हे सर्व विक्रेते परप्रांतिय आहेत. तर ग्रामीण भागातून येणार्या भाजी विक्रेत्यांची व्यवस्था नसल्याने ही मंडळी महामार्गालगत बसतात. तेथे आल्यानंतर पोलिस त्यांना भाजी विक्री करू देत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील विक्रेत्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करा अशी मागणी भाई चव्हाण यांनी आज प्रांताधिकार्यांना भेटून केली.