सिंधुदुर्गनगरी, ता.२३: जिल्हा सामान्या रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आलेल्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.या तिन्ही जणांचे नमुने तपासणी साठी पाठविण्यात आले असून त्यातील एक अहवाल प्राप्त झाला आहे. हा अहवाल निगेटीव्ह असल्यामुळे त्या रुग्णाचा मृत्यू हा कोरोना मुळे झाला नसल्याचे सिद्ध झाले आहे. इतर दोघंचा मृत्यू ही इतर आजारांमुळे झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी सांगितले.
आचरा येथे विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या महिलेचा मृत्यूही कोरोना मुळे झालेला नाही. या महिलेस इतर आजार होते. त्यांच्या उपचारासाठी ही महिला मुंबई येथे गेली होती. तेथून परत आल्यानंतर तिला घरीच अलगीकरण करण्यात आले होते. तीचा मृत्यू झाल्यानंतर तिचा स्वॅप तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये सध्या 62 रुग्ण दाखल आहेत. एकूण 228 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 197 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 31 नमुन्यांचा हवाल येणे बाकी आहे. सध्या जिल्ह्यात घरीच अलगीकरण करण्यात आलेल्या 271 व्यक्ती असून संस्थात्मक अलगीकरणामध्ये 67 व्यक्ती आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज एकूम 2277 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील निवारा केंद्रातील 264 व्यक्तींची तपासणी करून त्यांचे सामुपदेशन करण्यात आले आहे.
विलगीकरणातील “त्या” रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे नाही…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES