सावंतवाडी.ता,२३: शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारण्यास नगरपालिका स्थायी समितीच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली.पालिकेची स्थायी समितीची सभा गुरुवारी लोकमान्य टिळक सभागृहात नगराध्यक्ष परब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.सदर सभेत कार्यालयीन कामकाजविषयक व शहरातील विविध विकास कामांसंदर्भातील ५७ कामांना मंजूरी देण्यात आली.
तसेच या सभेत सावंतवाडी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचा ठराव नगराध्यक्ष परब यांनी मांडला.सर्व सदस्यांनी त्यास एकमताने मंजूरी दिली.यावेळी उपनगराध्यक्षा सौ.अन्नपूर्णा कोरगावकर, पाणीपुरवठा समिती सभापती श्री.नासिर शेख,आरोग्य समिती सभापती श्री.परिमल नाईक आणि महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीम. आनारोजीन लोबो हे सदस्य उपस्थित होते.