बांदा ता.२३: मगरीने केलेल्या हल्ल्यात मडु-यात म्हैस जखमी झाल्याची घटना घडली आहे.हा प्रकार आज सायंकाळच्या सुमारास परबवाडी येथील नदीत घडला.जखमी म्हैस ही येथील शेतकरी नारायण परब यांच्या मालकीची आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,मडूरा परबवाडी येथील शेतकरी नारायण परब यांचा मुलगा अनिष याने आज सायंकाळी गुरांना चरावयास सोडले होते.सायंकाळी तो गुरांना पाणी पिण्यासाठी नदीवर घेऊन गेला.म्हैशी नदीत गेल्या असता दबा धरुन बसलेल्या मगरीने अचानकपणे म्हैशीवर हल्ला केला.दरम्यान म्हैस व मगरीमध्ये बराच वेळ झटापट सुरु होती.अनिषने काठावरुन मगरीवर दगडफेक केली.मात्र मगरीने म्हैशीला सोडले नाही.त्याच दरम्यान म्हशीच्या दिशेने आणखी एक मगर वेगात येत असल्याचे पाहून अनिषने धीर एकवटून हातात दांडा घेऊन सुमारे ४ फूट खोल पाण्यात उडी मारली.दांड्याने मगरीवर प्रहार करताच मगर म्हशीला सोडून खोल पाण्यात गेली.मगरीच्या हल्ल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे.उद्या सकाळी पंचनामा करण्यात येईल,असे सावंतवाडी वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे यांनी सांगितले.आक्रमक मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांमधून होत आहे.
मडुरे -परबवाडी येथे म्हैशीवर मगरीचा हल्ला…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES