शहरवासीयांतून समाधानःया रस्त्याचे रेंगाळलेले काम ठरलेले कळीचा मुद्ददा…
सावंतवाडी.ता,२४: गेले अनेक दिवस रेंगाळलेल्या शहरातून जाणार्या मुंबई गोवा महामार्गाच्या काही भागाचे काम आज चालू करण्यात आले. त्यामुळे नागरीकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान लॉकडाउनच्या काळात हे काम सुरू करण्यात आल्याने संबधित ठेकेदाराला काम करताना वाहनांची वर्दळ नसल्यामुळे त्याचा फायदा होत आहे.
सावंतवाडी शहरातून जाणार्या मुंबई गोवा महामार्गाचे काम गेल्या वर्षापासुन रेंगाळले होते.माजगावातून बांद्यात जाणार्या तसेच कोलगाव सिमेवरुन झारापच्या दिशेने जाणार्या रस्त्याचा भाग डांबरीकरण करण्यात आला होता.मात्र शहरातून जाणारा रस्ता तसाच ठेवण्यात आला होता. त्यामुळे हा मुद्दा पाालिकेच्या पोट निवडणूकीत कळीचा बनला होता.
दरम्यान लॉकडाउनच्या पार्श्वभूमिवर हे काम सुरू करण्यात आले आहे. युध्दपातळीवर हे काम सुरू आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शहरातील लोकांना गुळगुळीत रस्ता मिळणार असल्यामुळे शहरवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे.