उदय सामंत; जिल्ह्यातील सातही रुग्णांचे झालेले मृत्यू हे अन्य कारणामुळे…
आरोस ता.२४: देवगड व मालवण तालुक्यातील खलाशांना हात पाय सुजणे आणि ताप येणे असा आजार होत आहे,त्यामुळे हा आजार नेमका कसा होतो ?,त्याचे कारण काय ?, याचे सर्व्हेक्षण करण्याच्या सुचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत.अशी माहीती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.दरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्ड मध्ये मृत्यू झालेल्या त्या सातही रुग्णांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत.त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.त्यांच्या मृत्यूची कारण ही वेगळी होती,असेही त्यांनी यावेळी सांगितले.ते येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.