कणकवली, ता.२४: एस. एम. हायस्कूल, कणकवलीचा तिसरीतील विद्यार्थी साहिल संदीप सरंगले याने ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशीप परीक्षेत 100 पैकी 98 गुण मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले आहे. तो जिल्ह्यात पहिल्या तर अखिल भारतीय रँकमध्ये दहावा आला आहे. साहिलला सौ. मधुरा मनोज पिळणकर यांचे मार्गदर्शन लाभले. साहिलचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालकांसह कणकवली शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आदींनी अभिनंदन केले आहे. याखेरीज जिल्हा परिषद शाळा कणकवली क्र. 3 चा विद्यार्थी वरद बाक्रे याने 91 टक्के गुण मिळवून सिल्व्हर मेडल मिळवत जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळविला. विद्यामंदिर कणकवलीच्या अनिकेत करंबेळकरने विशेष प्राविण्य प्राप्त केले. कणकवली शाळा क्र. 2 चा विद्यार्थी अथर्व सावंत याने 80 टक्के गुण मिळवत विशेष प्राविण्य प्राप्त केले. तर दुसरीतील राजवर्धन कापसे याने 87 टक्के गुण व मनस्वी पेडणेकर हिने 84 टक्के गुण मिळवित ब्राँझ मेडल पटकावले. त्यांच्या यशाबद्दल पालक व शिक्षकांनी अभिनंदन केले.
‘बीडीएस’मध्ये एसएमच्या साहिल सरंगलेला सुवर्णपदक…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES