सावंतवाडी पोलिसांचा दणका; ११ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल…
सावंतवाडी.ता,२४: लॉकडाउनच्या काळात आदेशाचा भंग करुन विनाकारण तळवडे बाजारपेठेत फिरणाऱ्या ३८ दुचाकी चालकांवर सावंतवाडी पोलिसांनी कारवाई केली असून,गेल्या दोन दिवसात ११ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.ही कारवाई सहायक पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व पोलीस नायक सखाराम भोई यांनी केली आहे,अशी माहिती श्री.लोहकरे यांनि दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर नाहक फीरू नये असे आदेश जिल्हाधिकार्यांकडुन देण्यात आले आहेत.मात्र या आदेशाकडे दुर्लक्ष करून काही लोक व युवक याकडे दुर्लक्ष करीत आहेत.व फिरत आहेत,अशा अनेक लोकांवर कारवाई होत आहे, मात्र हे गुन्हे दाखल झाले असले तरी काही लोकांना ते अदखलपात्र वाटत आहे, मात्र तशी परिस्थिती नाही,त्यात आपत्कालीन काळात जिल्हाधिकार्यांनी दिलेला आदेश पाळला नाही,तर तसेच साथरोग नियंत्रण कायदया अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात येत आहे, त्यामुळे भविष्यात मुलांना पासपोर्ट तसेच शासकीय नोकरी मिळवताना अनेक अडचणी येणार आहेत,त्यामुळे याबाबत कोणी सहज घेवू नये आणि आम्हाला कारवाई करण्यास भाग पाडू नये तसेच पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी केले यांनी केले होते.
मात्र तरी पण विनाकारण बाजारपेठ मध्ये फिरणाऱ्या दुचाकी चालक कारण नसताना फिरत असल्याने ही कारवाई सावंतवाडी तालुक्यातील होत आहे,तळवडे बाजारपेठ मध्ये ही कारवाई सावंतवाडी पोलीस निरीक्षक शशीकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.