सर्व दुकाने उघउा,केंद्र शासनाचे आदेश,मॉल व दारू दुकानांना वगळले…

1406
2
Google search engine
Google search engine

मुंबई.ता,२५: लॉकडाउनच्या काळात बंद करण्यात आलेली सर्व दुकाने उघडा,असा निर्णय केंद्र शासनाकडुन घेण्यात आला आहे.मात्र यातून मॉल आणी दारू दुकाने वगळण्यात आली आहेत,तर दुसरीकडे हॉटस्पॉट आणी कटोंनमेंट झोन मधील दुकाने उघडण्यास बंदी घालण्यात आली आहे.त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाकडुन कोणती भूमिका घेतली जाते.याकडे जिल्ह्यातील व्यापारी वर्गाचे लक्ष आहे.
दरम्यान जो पर्यत राज्य शासनाच्यावतीने याबाबत योग्य ते निर्देश देण्यात येत नाही. तो पर्यत आम्ही दुकाने उघडणार नाही,अशी भूमिका राज्य व्यापारी संघटनेच्यावतीने घेण्यात आली आहे.दरम्यान केंद्र शासनाकडुन अशा प्रकारे सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याने गेले महिनाभर दुकाने बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या दुकानदारांना फायदा होणार आहे,दरम्यान याबाबतचा निर्णय राज्य तसेच जिल्हा स्तरावर घेण्यात यावा,अशा सुचना देण्यात आल्या आहेत.त्यानुसार आज सायंकाळी राज्य शासनाकडुन निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.