डॉ.जयेंद्र परुळेकर; आंबा बागायतीत काम करणाऱ्यांसाठी सुद्धा मदतीची मागणी…
सावंतवाडी ता.२५: महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या काळात फार मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची संख्या वाढली आहे.त्यामुळे राज्यातील बेरोजगारांना पाच हजार रुपये प्रति महिना,तसेच आंबा काजू बागायतीत काम करणाऱ्यांना बेरोजगार भत्ता,केंद्र शासनाकडून देण्यात यावा,अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
श्री.परुळेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक जास्त बळी आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला केंद्र शासनाच्या मदतीची गरज आहे.दरम्यान हाराष्ट्र हे देशाला सर्वाधिक जास्त कर देणारे राज्य असून अनेक महिने थकीत असलेला १६ हजार कोटी रुपयांचा निधी केंद्र शासनाने तात्काळ देणे आवश्यक आहे.तसेच कोविड रुग्ण उपाययोजनेसाठी अतिरिक्त २५ हजार कोटी रुपये देणेही गरजेचे आहे.
महाराष्ट्र हे देशातील औद्योगिक दृष्ट्या अग्रेसर राज्य आहे.येथील छोटे व मध्यम उद्योजक राज्यातील ८० टक्के रोजगार निर्मिती करत असतात.
लाॅक डाऊन मुळे असे अनेक उद्योग कायमचे बंद होण्याचा धोका आहे.त्यांना या संकटकाळी वाचविण्यासाठी केंद्र सरकारने छोट्या व मध्यम उद्योगांना भरीव आर्थिक मदत करणे आता फार आवश्यक आहे.महाराष्ट्र राज्यात आताच फार मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढलेली आहे, राज्यातील बेरोजगार तरूणांना प्रति महिना पाच हजार रुपये बेकारभत्ता केंद्र सरकारने जाहीर करणे आवश्यक आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा,काजू बागायतीत काम करणारे मजूर तसेच मत्स्य व्यवसायातील मजूर यांना देखील बेरोजगार भत्ता मिळणं आवश्यक आहे.