सिंधुदुर्गनगरी,ता.२५: जिल्ह्यात आजमितीस २३६ व्यक्ती अलगीकरणात असून त्यापैकी १६५ व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले आहे.तर संस्थात्मक अलगीकरणात ७१ व्यक्ती दाखल आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये सध्या 51 रुग्ण दाखल असून आजपर्यंत एकूण 259 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यातील 228 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाले आहेत. अजून 31 नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत 2347 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
सध्या जिल्हा रुग्णालयामार्फत थालासेमिआच्या 10, डायलेसिसच्या 50 आणि केमो थेरपीच्या 1 रुग्णास सेवा देण्यात येत आहे.