Tuesday, January 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकारवाईनंतरही मालवण, वेंगुर्लेत एलईडीचा धुमाकूळ...

कारवाईनंतरही मालवण, वेंगुर्लेत एलईडीचा धुमाकूळ…

पारंपरिक मच्छीमारांची मत्स्य विभागाकडे तक्रार

मालवण, ता. २५ : मत्स्य व्यवसाय विभागाने दोन दिवसांपूर्वी गोव्यातील एक एलईडी ट्रॉलर पकडला. मात्र त्यानंतरही मालवण आणि वेंगुर्ले समोरील समुद्रात एलईडी दिव्यांच्या साह्याने होणाऱ्या बेकायदेशीर मासेमारीचा लखलखाट कायम आहे. यासंदर्भात पारंपरिक मच्छीमारांनी मत्स्य विभागाला निवेदन सादर करून कडक कारवाईची मागणी केली आहे.
दांडी येथून पारंपरिक गिलनेट प्रकारातील न्हय मासेमारीस गेलेले महेंद्र पराडकर यांनी यासंदर्भात मत्स्य विभागास निवेदन सादर करून एलईडी मासेमारी बंद करण्याची मागणी केली आहे. श्री. पराडकर हे निवती दीपस्तंभाजवळील ३० वाव खोल समुद्रात मासेमारीस गेले होते. सायंकाळी ७.३० वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत एलईडी दिव्यांचा लखलखाट कायम होता. किमान सात ते आठ एलईडी ट्रॉलर मालवण ते वेंगुर्लेपर्यंतच्या समुद्रात मासेमारी करत होते ही बाब श्री. पराडकर यांनी मत्स्य विभागाच्या निदर्शनास आणून दिली. काल दुपारी २.३० वाजता आम्ही मासेमारीस गेलो आणि आज पहाटे ५.३० च्या सुमारास किनाऱ्यावर परतलो. एवढ्या खोल समुद्रात मासेमारीस जाऊनही आम्हाला केवळ दोन बुगड्या आणि सहा बांगडे मिळाले. ज्यात आमचा इंधन खर्चसुद्धा भागणार नाही अशी खंत श्री. पराडकर यांनी व्यक्त केली.
दरम्यान काल मत्स्य विभागाची गस्तीनौका काय करत होती? गस्तीला गेली होती का? असा प्रश्न मत्स्य अधिकाऱ्यांना केला असता काल गस्तीनौका देवगडला गस्त घालत होती असे सांगितल्याचे श्री. पराडकर म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments