पोलिस कर्मचाऱ्यांची केली विचारपूस; अवैध वाहतुकीला आळा घालण्याची सूचना…
राजापूर.ता,२५:
संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे जिल्हा परिषद गटा तील साखरपा येथील रत्नागिरी-कोल्हापूर जिल्ह्याची हद्द असलेल्या पोलीस तपासणी नाक्याला आमदार डॉ. राजन साळवी यांनी भेट देऊन हद्दीतून जिल्ह्यामध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांची व त्यातील असलेल्या प्रवाशांची कशा प्रकारे तपासणी करण्यात येते हे जाणून घेतले. तसेच तेथे असलेल्या पोलीस कर्मचारी व आरोग्य सेवक यांची विचारपूस केली.
साखरपा घाटातील चेकपोस्टला भेट दिल्यानंतर राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी ह्यांना पंचायत समिती सदस्य जयाशेठ माने यांनी असे लक्षात आले की रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या कोल्हापूर-पुणे व इतर जिल्ह्यातुन येणारी वाहने अवैध रित्या कळकदरा या मार्गाने रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करत असून त्यांना वेळीच आळा घातला गेला नाही तर बाहेरचा जिल्ह्यातुन जर कोणी कोरोना ग्रस्त रुग्ण असा प्रकारे जर जिल्ह्यामध्ये आला तर ग्रीन झोन मध्ये येत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो हे गांभीर्य लक्षात येताच आमदार डॉ. साळवी यांनी तात्काळ समयसूचकता दाखवत सहाय्यक पोलीस निरीक्षक पाचपुते यांचाशी चर्चा करून ही बाब लक्षात आणून दिली. त्याबाबत कडक कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या. त्याप्रसंगी संगमेश्वर तहसिलदार थोरात, विधानसभा क्षेत्रप्रमुख जयाशेठ माने, उपतालुकाप्रमुख शेखर कोलते, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती रजनीताई चिंगळे, सरपंच विजय पाटोळे, उप सरपंच विनायक गोवरे, ग्रामविकास अधिकारी इंदुलकर, मंडळ अधिकारी दामले, तलाठी पवार, राजा वाघधरे आदी उपस्थित होते.