Monday, January 13, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकणकवली विधानसभा मतदारसंघात १५ हजार मास्कचे वाटप...

कणकवली विधानसभा मतदारसंघात १५ हजार मास्कचे वाटप…

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या पुढाकारातून उपक्रम…

कणकवली.ता,२५: सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष,शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या माध्यमातून कणकवली वैभववाडी देवगड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी १५ हजार मास्कचे वाटप करण्यात आले आहे.आज कणकवली तालुक्यातून याची सुरुवात झाली.विजयभवन येथे कणकवली तालुक्यातील जि. प. विभागानुसार शिवसेनेच्या विभागप्रमुखांकडे प्रातिनिधिक स्वरूपात हे मास्क वितरित करण्यात आले. येत्या दोन दिवसात शिवसेना विभागप्रमुख या मास्कचे वाटप नागरिकांना करणार आहेत. कठीण प्रसंगात शिवसेनाच लोकांच्या मदतीसाठी धावून जात असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतीश सावंत यांनी हे मास्क वाटप केल्याबद्दल संदेश पारकर यांनी त्यांचे आभार मानले. तसेच या उपक्रमाचे आ. वैभव नाईक यांनीही कौतुक केले.
यावेळी संदेश पारकर म्हणाले, सिंधुदुर्गात कोरोनाचा प्रादुर्भाव नसला तरी शिवसेनेच्या माध्यमातून या व्हायरसवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.आज सतीश सावंत यांच्या माध्यमातून कणकवली तालुक्यासाठी मास्क देण्यात आले आहेत.देवगड वैभववाडी तालुक्यातही अशाच प्रकारे मास्कचे वाटप केले जाणार आहे.गेल्या महिनाभर पालकमंत्री उदय सामंत,खासदार विनायक राऊत,आ.वैभव नाईक, आ. दीपक केसरकर,सतीश सावंत संजय पडते व आम्ही सर्वजण कोरोनाशी लढत आहोत. लोकांमध्ये जनजागृती करून त्यांच्यातील भय,नैराश्य घालवण्याचा प्रयत्न करत आहोत.याचा जिल्हावासीयांना नक्कीच फायदा होईल.जिल्हा प्रशासन देखील उत्तम काम करत आहे. जिल्ह्यातील जनता तितकेच सहकार्य प्रशासनाला करत आहेत.त्यामुळे आपला जिल्हा लवकरच ग्रीन झोन मध्ये येईल.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, हर्षद गावडे, अनुप वारंग, रुपेश आमडोस्कर, बाबू पेडणेकर, अरविंद राणे,आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments