तहसीलदार म्हात्रेंची माहिती; शासकीय इ-पास घेऊन औरंगाबाद येथून दाखल…
सावंतवाडी,ता.२५: प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सर्व आवश्यक शासकीय परवानग्या घेऊन औरंगाबाद मधुन गोव्याकडे आलेल्या चौघा गोयकारांना आज गोवा शासनाने आपल्या राज्यात घेण्यात नाकारले,त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य प्रशासनाला त्यांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.त्यांना सद्यस्थितीत सावंतवाडीत क्वारंटाईन करण्यात आले आहे.याबाबतची माहिती सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली.
त्या चौघा युवकांनी औरंगाबादहुन गोव्याकडे येण्यासाठी आवश्यक असलेल्या ई-पास, आरोग्य तपासणी अहवाल आदी सर्व गोष्टी आणल्या होत्या. परंतु केवळ ते बाहेरून आले आहेत,असे कारण दाखवत सुरक्षेच्या दृष्टीने गोवा शासनाने त्या चौघांनाही आपल्या राज्यात प्रवेश नाकारला, त्यामुळे आता त्यांच्यावर सावंतवाडीतच राहण्याची वेळ आली आहे.