वेंगुर्ले तहसीलदारांच्या रास्त धान्य दुकानदारांना सूचना…
वेंगुर्ला,ता.२५: पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्य पुरवठा योजनेचा लाभ हा फक्त अन्नसुरक्षा, अंत्योदय योजनेंतर्गत समाविष्ट शिधापत्रिकारांना देण्यात आलेला आहे. उर्वरित केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य मोफत धान्य न देता सवलतीच्या दराते धान्य देण्यात येणार आहे. केशरी शिधापत्रिकाधारकांना मे २०२० या महिन्याचे धान्य हे २४ एप्रिल पासून रा.भा.धान्य दुकानातून वितरीत करण्यास सुरुवात केली आहे. तरी रा.भा.धान्य दुकानदारांनी लाभार्थींची होणारी गर्दी टाळण्यासाठी वाडीनिहाय धान्य वितरण सामाजिक अंतर राखून करावयाचे आहे अशा सूचना वेंगुर्ला तहसिलदार यांनी दिल्या आहेत.
कोव्हिड-१९ विषाणूचा प्रादूर्भाव लॉकडाऊन कालावधीत शासनाने ग्रामिण व शहरी भागातील रा.भा.धान्य दुकानांशी जोडलेल्या अन्नसुरक्षा, अंत्योदय योतनेंतर्गत समाविष्ट शिधापत्रिकाधारकांना मे २०२० या महिन्यासाठी नियमित धान्याबरोबरच पंतप्रधान गरीब कल्याण अन्नयोजनेंतर्गत मोफत धान्याची उपलब्धता करुन दिलेली आहे. तसेच याव्यतिरिक्त उर्वरीत केशरी शिधापत्रिकाधारकांना राज्य शासनाकडून मे व जून या महिन्याकरीता तांदुळ प्रतिकिलो १२ रुपये व गहू प्रतिकिलो ८ रुपये या सवलतीच्या दराने प्रति व्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ एवढे धान्य मंजूर करण्यात आले आहे.
वेंगुर्ला तालुक्यातील ३९ रा.भा.धान्य दुकानांना योजनांनिहाय धान्य नियतन पुरवठा शाखा, तहसिलदार कार्यालय, वेंगुर्लाकडून वितरीत करण्यात आलेले आहे. केशरी शिधापत्रिकाधारकांना मे २०२० या महिन्याचे धान्य हे २४ एप्रिल पासून रा.भा.धान्य दुकानातून वितरीत करण्यास सुरुवात केली आहे. तरी रा.भा.धान्य दुकानदारांनी मे महिन्याचे एपीलएल धान्य ऑफलाईन वितरण करुन त्याच्या नोंदी स्वतंत्र नोंदवहीत घ्यावयाच्या आहेत. दुकानदारांनी लाभार्थींची होणारी गर्दी टाळण्यासाठी वाडीनिहाय धान्य वितरण सामाजिक अंतर राखून करावयाचे आहे अशा सूचना वेंगुर्ला तहसिलदार यांनी दिल्या आहेत.