ग्रामस्थ आक्रमक; कोणत्याही स्पष्ट सुचना नसल्याचे सांगुन पोलिसांनी गाड्या सोडल्याचे म्हणणे….
आंबोली,ता.२६: बेळगाव आणि संकेश्वर येथिल भाजी असल्याचे कारण पुढे करुन आज आंबोली येथिल ग्रामस्थांनी त्या ठीकाणी पोलिस दुरक्षेत्रावर गाड्या अडविल्या, तसेच त्या परत पाठवा, अशी मागणी पोलिसांकडे केली. मात्र जीवनावश्यक वस्तू वाहतूक करणार्या गाड्या अडविण्याबाबत पोलिस तसेच जिल्हा प्रशासनाकडुन कोणत्याही स्पष्ट सुचना नाहीत. तसेच त्यांच्याकडे आवश्यक असलेले ई-पास आहेत. असे कारण पुढे करुन या गाड्या पुन्हा सिंधुदूर्गच्या दिशेन सोडण्यात आल्या.
काल सावंतवाडीत झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत बेळगाव, संकेश्वर परिसरात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण मिळत असल्याने त्या ठीकाणावरुन येणारी भाजी खरेदी करण्यात येवू नये, तसेच त्या गाड्यांना या ठीकाणी प्रवेश देण्यात येवू नये, असा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र या पार्श्वभूमिवर बेळगाव, संकेश्वर येथून येणार्या गाड्या आंबोली ग्रामपंचायत सदस्य संतोष पालयेकर आदी त्यांच्या सहकार्यांनी रोखल्या. यावेळी गाडीतील पावत्या तपासण्यात आल्या असता, त्या गाड्यांमध्ये असलेली भाजी ही बेळगाव आणि संकेश्वर येथिल असल्याचे दिसले त्यामुळे या गाड्या पुन्हा पाठविण्यात याव्यात, अशी मागणी श्री पालयेकर यांनी पोलिसांकडे केली. मात्र या मागणीकडे पोलिसांनी गांभीर्याने पाहीले नाही, असे श्री पालयेकर यांचे म्हणणे आहे. मात्र त्यांच्याकडे आवश्यक असलेला ई-पास आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तूच्या गाड्या अडविण्याबाबत आपल्याला कोणतेही आदेश नाही. असे पोलिस प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे या गाड्या सोडून देण्यात आल्या, असे तेथिल पोलिस कर्मचार्यांकडुन सांगण्यात आले.