मुख्यमंत्री ठाकरे; मुभा कोणत्या गोष्टीला द्यावी,याचा निर्णय लॉकडाउन नंतर…
मुंबई ता.२६: कोरोनाच्या विरोधात असलेली लढाई आपण नक्कीच जिंकू,मात्र अशा जीवघेण्या खेळात कोणी राजकारण करू नये,असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.दरम्यान लॉकडाउन नंतर कोणत्या गोष्टीला मुभा द्यावी,याबाबतचा निर्णय घेवू तर जीवनावश्यक वस्तूसोबत फळे घरपोच कशी देता येतील यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत,असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून आज जनतेशी संवाद साधला.यावेळी ते म्हणाले कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही निश्चीतच प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आवश्यक असलेली लस प्लाझा थेरपी आदींवर चर्चा सुरू आहे. हे संकट दुर होण्यासाठी प्रयत्न होत असताना काही जण अशा परिस्थितीत सुध्दा राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.हे चुकीचे आहे,असे सांगुन आपल्याला पाठींबा दर्शविणार्या केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे त्यांनी आभार मानले.
ते पुढे म्हणाले, या ठीकाणी काही गोष्टींना मुभा देण्यात आली होती. मात्र मुंबई सारख्या ठीकाणी वर्दळ वाढल्यामुळे यावर नियंत्रण ठेवावे लागले आहे. त्यामुळे लॉकडाउन असे पर्यत याबाबत कोणताही निर्णय घेणार नाही. तसेच रेल्वे सुरू करणार नाही .पोलिस डॉक्टर आणि पत्रकारांत देवळातील देव आहेत,असेही त्यांनी सांगितले.