राज्यातील एकमेव आमदार; स्वतः हातात माईक घेवून,चालत केली जनजागृती…
कणकवली ता.२६: गेेले काही दिवस मुंबईतून आल्याने कॉरन्टाईन असलेल्या आमदार नितेश राणे यांनी स्वतः रस्त्यावर उतरत हातात माईक घेवून कोरोनाच्या विरोधात जनजागृती केली.यावेळी कोरोनाच्या विरोधात उभारण्यात आलेल्या लढ्याला येथिल जनतेने सहकार्य करावे,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
श्री.राणे यांनी फोंडाघाट बाजारपेठेत आपल्या सहकार्यासमवेत ग्रामस्थांना हे आवाहन केले.यावेळी सरपंच संतोष आग्रे,माजी सभापती सौ सुजाता हळदिवे, तालुकाध्यक्ष राजन चिके ,संतोष कानडे, सरचिटणीस सुदन बांदिवडेकर ,बबन हळदिवे, राजन नानचे, भालचंद्र राणे ,शामल म्हाडगुत,सिद्धेश पावसकर, हेमंत राणे, पिंटू पटेल, छोटू पारकर ,अजित नाडकर्णी, दर्शना पेडणेकर, विश्वनाथ जाधव आदी उपस्थित होते.
बाजारातून आवाहन केल्यानंतर चेकपोस्ट गाव वेशीवर नेण्याच्या मागणीवर, पिककर्ज, सोसायटीच्या समस्या, इत्यादीबाबत श्री.राणे यांनी चर्चा केली.पोलिसांना बाहेरून गावात येणाऱ्यांवर तसेच गावात संचारबंदी,गर्दीचे नियम न पाळणार्यावर आणि कामाशिवाय फिरणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले.यावेळी कॉन्स्टेबल दया चव्हाण,अभिषेख अविटकर, मुल्ला ,वंजारे इत्यादी उपस्थित होते.