सिंधुदुर्गनगरी,ता.२६ – जिल्ह्यात आजमितीस 246 जण अलगीकरणात आहेत. त्यापैकी 149 जणांना घरीच अलगीकरणात ठेवण्यात आले असून 97 जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयाने आतापर्यंत एकूण 274 नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. त्यातील 262 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून 12 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये सध्या 26 रुग्ण दाखल आहेत. तर आरोग्य यंत्रणेमार्फत आज एकूण 2168 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोना विषयी माहिती व सेवेसाठी स्वस्थ भारत ॲप कार्यान्वित केले आहे. सदरचे ॲप esanjeevaniopd.in या संकेत्स्थळावरून डाऊनलोड करता येते. या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन ओपीडी, प्राथमिक उपचाराविषयी मार्गदर्शन मोफत मिळते. त्यामुळे प्राथमिकस्तरावर दक्षता घेणे सोपे जाणार आहे. या ॲपचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यात २४६ जण अलगीकरणात…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES