बबन राणेंचा पुढाकार; क्षेत्रफळवाडीतील ५० गरजू कुटूंबांना दिला लाभ…
इन्सुली ता.२६: येथील कै.गोपिका गोपाळ गावडे यांच्या प्रथम स्मृती दिना निमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माजी पंचायत समिती सदस्य नारायण उर्फ बबन राणे यांनी क्षेत्रफळवाडीतील ५० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.यावेळी नाना पेडणेकर,विजय डुगल देवेंद्र भिसे,गोकुळदास पोपकर,वामन बांदिवडेकर आदी उपस्थित होते.
कै.गोपिका गावडे यांचे वर्षभरापूर्वी निधन झाले होते.दरम्यान त्यांचा मुलगा कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत असल्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी येऊ शकला नव्हता,यावेळी श्री.राणे यांनीचं पुढाकार घेऊन त्यांचे सर्व अंत्यविधी केले होते.तर आज त्यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांनी हा अनोखा उपक्रम राबविला.