Wednesday, January 15, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यादेवलीत वाळू चोरी प्रकरणी तिसऱ्या संशयितास अटक...

देवलीत वाळू चोरी प्रकरणी तिसऱ्या संशयितास अटक…

मालवण पोलिसांची कारवाई ; तिघांचीही १५ हजाराच्या सशर्त जामिनावर मुक्तता…

मालवण, ता. २६ : देवली येथील वाळू चोरीप्रकरणी मालवण पोलिसांनी आज तिसर्‍या संशयित आरोपी आत्माराम ऊर्फ बंटी जयवंत चव्हाण (वय-३० रा. देवली खालची मधलीवाडी ता. मालवण) याला अटक केली. याप्रकरणी आज तिन्ही संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता प्रत्येकी पंधरा हजार रुपयांच्या सशर्त जामीनावर त्यांची मुक्तता केली.
तहसीलदार अजय पाटणे यांच्या नेतृत्वाखाली महसूलच्या पथकाने देवली येथे कारवाई करत एक वाळूचा डंपर पकडला होता. यात डंपर चालक, मालक, तसेच वाळू पुरविणारा अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंडळ अधिकारी रवींद्र निपाणीकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी प्रभाकर लालू राठोड (वय-३०, रा. कुडाळ उद्यमनगर), महेश तुकाराम शिरसाट (रा.उद्यमनगर कुडाळ) यांच्यासह आत्माराम चव्हाण या तिघांच्या विरोधात चोरट्या वाळूची वाहतूक केल्याप्रकरणी, साथरोग प्रतिबंधक अधिनियम कलम १८९७ चे कलम ३,४, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम ५१(ब), पर्यावरण संरक्षण अधिनियम ३, १५ अन्वये गुन्हा दाखल केला होता. पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण यांनी तपास केला. यातील दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आज तिसर्‍या संशयितास अटक करण्यात आली. तिघांनाही न्यायालयात हजर केले असता प्रत्येकी पंधरा हजार रुपयांच्या सशर्त जामीनावर मुक्तता करण्यात आली. संशयित आरोपींच्यावतीने अ‍ॅड. स्वरूप पई यांनी काम पाहिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments