नितेश राणेंचे आवाहन; सावंतवाडीत हेल्थ फार्म क्वारंटाईन सेंटरला दिली भेट…
सावंतवाडी ता.२६: कोरोनाच्या काळात जे सर्दी खोकल्याचे रूग्ण आहेत,त्यांचा भार शासकीय यंत्रणेवर येऊ नये,यासाठी शहरातील खाजगी डॉक्टरांनी पुढे यावे,असे आवाहन आमदार तथा भाजपचे नेते नितेश राणे यांनी आज येथे केले.दरम्यान सावंतवाडी शहरात सेवा देणाऱ्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.तसेच तुम्हाला काही सुविधा लागल्या तर कळवा,आपण त्या तात्काळ उपलब्ध करून देऊ,असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.श्री.राणे यांनी आज येथील हेल्थ फॉर्म प्रकल्पाच्या ठीकाणी क्वारंटाईन करण्यात आलेल्या रुग्णांची पाहणी केली.यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी नगराध्यक्ष संजू परब,आरोग्य सभापती परिमल नाईक,पाणी पुरवठा सभापती नासीर शेख,नगरसेवक राजू बेग,सुधीर आडिवरेकर,अजय गोंधावळे,वैदयकीय अधिक्षक उत्तम पाटील,ज्ञानेश्वर दुर्भाटकर,मुरली चव्हाण,संदिप सावंत आदी उपस्थित होते.