वेंगुर्ला,ता.२६: आरवली विकास मंडळ संचलित आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्रातर्फे आरवली पंचक्रोशीतील अत्यंत गरीब, गरजू व परप्रांतीय व्यक्तींना सुमारे ५५ हजार रुपये किमतीच्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेले २०० किटचे वितरण करण्यात आले.
सध्या देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्रातर्फे सदरची मदत करण्यात आली आहे. तसेच ग्रामस्थांना सोशल डिस्टसिग विषयी मार्गदर्शन केले. आणि घरात रहा व काळजी घ्या असे आवाहन करण्यात आले.
आरवली वैद्यकीय केंद्रातर्फे गरजूंना २०० किटचे वितरण…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES