Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
एडगाव घाडीवाडी नजिक घडली घटना; सुदैवाने जीवितहानी टळली…
वैभववाडी,ता.२७: एडगाव घाडीवाडी नजिक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मैदा पिठाने भरलेला ट्रक गटारात पलटी झाला. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. तर मैदा पिठाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी पहाटे घडली.
मैद्याच्या पिशव्या भरलेला ट्रक साताऱ्याहून गोव्याकडे जात होता. एडगांव नजीक धोकादायक वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून ट्रक गटारात पलटी झाला. दरम्यान ट्रकमध्ये चालकासह इतर दोघे जण होते. तिघेही अपघातातून बालबाल बचावले आहेत. अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली नव्हती.
Download WordPress Themes Nulled and plugins.