Monday, January 13, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावाढदिवसानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांना केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप...

वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांना केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकरांचा सामाजिक बांधिलकीतून उपक्रम…

सावंतवाडी ता.२७:येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी आज आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून अनोख्या पद्धतीने साजरा केला.यावेळी कोरोच्या काळात अहोरात्र मेहनत घेणाऱ्या पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना व इतर २३० गरजूंना त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
सध्या देशावर आलेल्या कोरोनाचे संकट आणि राज्यात असलेली संचार बंदी लक्षात घेता पोलीस व डॉक्टर यांच्यासोबत या संकटात महत्वाची भूमिका बजावणारे नगरपालिका सफाई कर्मचारी सध्या अहोरात्र मेहनत करत आहे.त्यांना श्री कोरगावकर यांनी तांदूळ,डाळ,कांदे जीवनावश्यक वस्तू व सेनिटायजर चे वाटप केले.तर इतर २३० गरजूंना जीवनावश्यक वस्तू व मास्कचे वाटप केले.यावेळी अखिलेश कोरगावकर ,विराग मडकईकर उपस्थित आदी होते.दरम्यान त्यांनी कोरोनाच्या काळात याआधीही परप्रांतीय कामगारांना जीवनावशक्य वस्तूचे वाटप केले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments