Wednesday, January 15, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याराष्ट्रवादी काँग्रेसकडून सिंधुदुर्गातील दंतचिकित्सकांना "फेसशिल्ड" चे वाटप...

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सिंधुदुर्गातील दंतचिकित्सकांना “फेसशिल्ड” चे वाटप…

सावंतवाडी ता.२७: कोरोना विषाणू विरूद्ध लढण्यात जोमाने पुढे असणाऱ्या डॉक्टर समुदायाला मदत करण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने जिल्हयातील सर्व दंतरोग चिकित्सक डॉक्टरांना “फेसशिल्ड” देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस सुरेशराव गवस व प्रांतिक सदस्य उदय भोसले यांच्या हस्ते इंडियन डेंटल असोसिएशनचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष डॉ. सुरज देसकर यांना वितरण करण्यात आले.
पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार,खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण, डॉक्टर सेल प्रदेश अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट तर्फे राज्यात दीड लाख फेसशिल्डचे वितरण आरोग्य व्यवस्थामधील डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांना केले जात आहे.
कोरोना विषाणूच्या संकट काळामध्ये वैद्यकीय सेवा ही आपली युद्धभूमी समजून धैर्याने सेवा देत आहेत. अशा सर्व डॉक्टरांना फेसशिल्ड देण्यात येत आहे.जिल्ह्यात अनेक वैद्यकीय संघटनामार्फत फेसशिल्ड चे वितरण करण्यात आले, असे डॉ.संजीव लिंगवत यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे जिल्हा अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, उपाध्यक्ष डॉ प्रसाद प्रभु साळगांवकर, डॉक्टर सेल सावंतवाडी तालुकाध्यक्ष विजय तोरस्कर, शहराध्यक्ष सत्यजित देशमुख, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष विजय कदम,गुरुदत्त कामत आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments