परशुराम उपरकर; खासदार,पालकमंत्री व केसरकरासह राणेंवर टिका…
सावंतवाडी ता.२७: आमदार वैभव नाईक यांच्या निधीतून जिल्हा शासकीय रुग्णालयात देण्यात आलेली पीपीई कीट बोगस होती.एकदा वापरल्यानंतर ती खराब झाली,असा आरोप आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला .यावेळी त्यांनी खासदार विनायक राउत यांच्यासह आमदार दिपक केसरकर,नितेश राणे पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार हल्ला बोल चढविला.
खासदार विनायक राउत यांना मी केेलेली टिका झोंबली त्यामुळे मला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांच्यावर काही शिवसैनिकांच्या गळी पडण्याची वेळ आली आहे .मी लोकांसाठी काम करतो,असे सांगतात ते सावंतवाडीतील लोकप्रतिनिधी नेमके कोठे लपले आहे.त्यांचा पाय अद्याप बरा झाला नाही का ?,असा प्रश्न करून आमदार नितेश राणे यांचे कालचे रस्त्यावर येवून अलाउन्सींग करणे म्हणजे निव्वळ दिखावा आहे, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली
श्री उपरकर यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली.यावेळी त्यांनी खासदार विनायक राउत यांच्यासह आमदार दिपक केसरकर,नितेश राणे आणी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार टिका केली.जे मला शिवसेनेत येण्याचे आवताण देत आहे.त्याचा मी सेनेत असताना आणी सोडताना जन्म सुध्दा झाला नव्हता,त्यामुळे उपर्यांनी माझ्यावर टिका करू नये असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी आमदार केसरकर यांच्यावर नाव न घेता टिका केली नेहमी लोकांसाठी आपण काम करतो असे सांगणारे नेमके कोणत्या बिळात जावून लपले याचे उत्तर त्यांनी द्यावे असा प्रश्न केला .दरम्यान आपण कोणावर टिका करीत नाही तर त्यांना सल्ले देत आहे असे ही उपरकर यांनी सांगुन टाकले.
यावेळी मुंबईत अडकलेल्या चाकरमान्यांनी कोरोना नंतर याठीकाणी येवून दुध अंडी उत्पादन करणारे प्रकल्प सुरू करावेत दहा पंधरा हजाराच्या पगारावर काम करण्यापेक्षा जिल्ह्यात येवून सात आठ हजाराचे उत्पन्न घेवून समाधानी रहावे
त्यांनी यावेळी जिल्हा आणी पोलिस प्रशासनाचे कौतूक केले केवळ त्यांच्या सतर्कतेमुळे आपला जिल्हा आज ग्रीन झोन कडे वाटचाल करीत आहे .
यावेळी शहर अध्यक्ष आशीष सुभेदार,कुणाल कीनळेकर,शुभम सावंत,संतोष सावंत आदी उपस्थित होते